Farmer Accident Insurance Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Accident Insurance : शेतकऱ्यांच्या वारसांना पाच महिन्यांत एक कोटीचे वितरण

Agriculture Scheme : शेतकऱ्यांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत नुकसान अथवा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू आहे.

Team Agrowon

Satara News : शेतकऱ्यांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत नुकसान अथवा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू आहे. या योजनेत जिल्ह्यातील पाच महिन्यांत ५४ शेतकऱ्यांच्या वारसांना एक कोटी आठ लाखांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. यात कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक १३ प्रस्तावांचा समावेश आहे. या योजनेतील विमा रकमेत शासनाने वाढ केल्याने बाधित शेतकऱ्यांच्या वारसांना दिलासा मिळत आहे.

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. काहींना अपंगत्व येते.

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते, अशा शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना सुरू आहे. यात अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांचे सानुग्रह अनुदान दिले जात आहे.

यात अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये व अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान दिले जाते.

मागील पाच महिन्यांत गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत ५४ प्रस्ताव प्राप्त मंजूर झाले असून, त्यापोटी शेतकऱ्यांच्या वारसांना एक कोटी आठ लाख रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

तालुकानिहाय मंजूर दावे असे सातारा ९, कोरेगाव १३, खटाव चार, कऱ्हाड चार, पाटण तीन, वाई दोन, जावळी पाच, महाबळेश्वर चार, खंडाळा पाच, फलटण तीन, माण दोन प्रस्तावांचा समावेश आहे. तालुकानिहाय विमा रक्कम अशी आहे. सातारा १८ लाख, कोरेगाव २६ लाख, खटाव आठ लाख, कऱ्हाड आठ लाख, पाटण सहा लाख, वाई चार लाख, जावळी दहा लाख, महाबळेश्वर आठ लाख, खंडाळा दहा लाख, फलटण सहा लाख, माण चार लाख रुपयांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT