Soybean Seed Distribution Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed Distribution : पोखर्णी येथे तेलताड अभियानांतर्गत निविष्ठाचे वाटप

Soybean Seed Update : शेतकऱ्याची निवड करून लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाण ‘फुले कीमया’ तसेच इतर निविष्ठाचे वाटप करण्यात आले.

Team Agrowon

Nanded News : पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने राजवाडी (ता. मुदखेड) व वायफाना खुर्द (ता. हदगाव) येथे एकूण २० हेक्टर क्षेत्रावर राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियानांतर्गत समूह आद्यरेषीय गळीतधान्य सोयाबीन पीक प्रात्यक्षिक हे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत शेतकऱ्याची निवड करून लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाण ‘फुले कीमया’ तसेच इतर निविष्ठाचे वाटप करण्यात आले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. एच. डी. मोरे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख उपस्थित होते. तसेच तसेच कृषी विद्या तज्ञ प्रा.संदीप जायभाये या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये डॉ. मोरे यांनी सध्याच्या परिस्थितीत जमिनीतील पुरेसा ओलावा असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्याचे उत्पादन निश्चितच वाढ होते असे सांगितले.

तसेच डॉ. देविकांत देशमुख यांनी या योजनेचे महत्त्व सांगून शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे कार्य व चालू उपक्रम आणि प्रशिक्षण तसेच भाजीपाला व फुलशेती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संशोधित भाजीपाला व फळांच्या विविध वाणांची तसेच जैविक व सेंद्रिय निविष्ठा ची ओळख शेतकरी बांधवांना करून दिली.

प्रा. संदीप जायभाये यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान यामध्ये वाणाचे वैशिष्ट्ये पेरणीची लागवड पद्धत खत व्यवस्थापन, बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन केले. यावेळी दोन्ही गावातील लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राकेश वाडीले, शंकर कोनापुरे, राहुल राऊत यांनी सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT