Award Distribution Agrowon
ॲग्रो विशेष

Departmental Awards : ग्रामविकास, पंचायत राज विभागाच्या पुरस्काराचे वितरण

Divisional Level Awards : ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने २०२०-२१ व २०२२-२३ या वर्षातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते करण्यात आले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने २०२०-२१ व २०२२-२३ या वर्षातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनमोल सागर, उपायुक्त सुरेश बेदमुथा, डॉ. सीमा जगताप आदी उपस्थित होते. या वेळी विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले, की लातूर जिल्हा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे.

गुड गर्व्हर्नसमध्येही जिल्ह्याने पथदर्शी काम केले आहे. लातूरचा एक पॅटर्न आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच लातूर जिल्ह्याने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत चांगले काम केले आहे. मराठवाड्यात पंचायतराज व्यवस्थेत चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. पर्यावरण क्षेत्रात कामाची गरज असून, यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

पर्यावरणाचा समतोल जपला गेला पाहिजे. गावशिवारात हिरवाई जपण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येक घटकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. २०२०-२१ विभागीय स्तर प्रथम क्रमांक पंचायत समिती, लातूर ११ लाख रुपये, द्वितीय क्रमांक पंचायत समिती, नांदेड ८ लाख रुपये, तृतीय क्रमांक पंचायत समिती, शिरूर अनंतपाळ, जि. लातूर ६ लाख रुपये या पंचायत समितीचा धनादेश

आणि स्मृतिचिन्ह विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. २०२२-२३ जिल्हा परिषद, लातूर यांना राज्यस्तरीय तृतीय क्रमांक १७ लाख रुपये, पंचायत समिती, लातूर यांना राज्यस्तर प्रथम क्रमांक २० लाख रुपये, पंचायत समिती, लातूर यांना विभागस्तर प्रथम क्रमांक ११ लाख रुपये, पंचायत समिती, जळकोट, जि. लातूर यांना विभागस्तर द्वितीय क्रमांक ८ लाख रुपये, पंचायत समिती, अर्धापूर, यांना विभागस्तर तृतीय क्रमांक ६ लाख रुपये असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Alert: मराठवाड्यात पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

Khandesh Rainfall : पावसाची पाठच; ‘हतनूर’मधून विसर्ग घटला

Nashik DCC Bank : जिल्हा बँकेची सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू

Floriculture Management: सणासुदीसाठी झेंडू, शेवंती, निशिगंध फुलांचे नियोजन कसे करावे? उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचा सल्ला

PM Kisan Yojana : दुहेरी नोंदणीमुळे पीएम किसानचा लाभ मिळेना

SCROLL FOR NEXT