Anandacha Shidha Ration agrowon
ॲग्रो विशेष

Anandacha Shidha Ration : ‘आनंदाचा शिधा’ अडकला तेलात; कोल्हापुरातील लाभार्थ्यांना प्रतीक्षा

Anandacha Shidha Kolhapur : आनंदाचा शिधा योजनेत लाभार्थींना एक किलो हरभरा डाळ, एक किलो रवा, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल अशा चार वस्तूंच्या पॅकेटचा हा आनंदाचा शिधा असणार आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Governmet Ration Supply : राज्य सरकारकडून राबवण्यात आलेल्या आनंदाचा शिधा योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. अद्यापही रेशन दुकानदारांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही. जिल्हा पुरवठा विभागाकडे तेल उपलब्ध नसल्याने आनंदाचा शिधा वाटप रखडले आहे.

याबाबत राधानगरी तालुका पुरवठा अधिकारी पोवार यांच्याशी संपर्क साधल्यास ते म्हणाले, पुरवठा विभागामध्ये ‘आनंदाचा शिधा’मधील तेल वगळता इतर सर्व साहित्य उपलब्ध आहे. तेलाची मागणी केली आहे. ते उपलब्ध होताच ‘आनंदाचा शिधा’चे वाटप केले जाईल अशी माहिती पोवार यांनी दिली.

राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा योजनेत लाभार्थींना एक किलो हरभरा डाळ, एक किलो रवा, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल अशा चार वस्तूंच्या पॅकेटचा हा आनंदाचा शिधा असणार आहे. राज्यात २०२३ पासून ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवात आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, शिधा सामग्री अद्याप पोहोचलेली नसल्याने लाभार्थ्यांना यापासून वंचित राहावे लागले. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्‍त केला जात आहे.

तालुका पुरवठा विभागाकडे आनंदाच्या शिधामधील तेल वगळता इतर साहित्य पोहोचले आहे. परंतु, तेलाचा पुरवठा न झाल्याने आनंदाचा शिधा वाटप रखडले आहे. त्याचा लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गोरगरीब लाभार्थ्यांमध्ये सरकारच्या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शासन ‘आनंदाचा शिधा’ देईल अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत स्वस्त धान्य दुकानात विचारणा केली असता शासनाकडून आम्हाला तो उपलब्ध झाला नसल्याचे सांगितले. दसरा सणाला तरी तो उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा राधानगरी तालुक्यातील गावकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT