Water Supply Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : नगरमधील पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत अफरातफर

MLA Nilesh Lanke : जलजीवन मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप आमदार नीलेश लंके यांनी केला.

Team Agrowon

Nagar News : जलजीवन मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप आमदार नीलेश लंके यांनी केला. हा घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लंके यांनी केली.

आमदार लंके यांनी सांगितले, की जिल्ह्यात जलजीवन काम देण्यासाठी गैरमार्गाचा अनेकदा अवलंब करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्यानंतर काम पूर्ण नसणे, बीड कॅपॅसिटी नसताना वाढवून दाखविण्यात आली आहे. कॅपॅसिटीपेक्षा सहा कोटींची जास्त कामे देण्यात आली.

एका ठेकेदारास सुरुवातीला अपात्र ठरविणे व त्याच ठेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आले आहे. टेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेंडर नोटिशीमधील अटी बदलणे अशा गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी नमूद केले.

जलजीवनचे पारनेर-नगर मतदार संघातील जामगावसह सहा गावांची पाणीपुरवठा योजनेचे काम घेताना काही संस्थांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम देण्यात आले आहे.

या ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे दाखलेही खोटे सादर केले असून, त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नाही, तसेच सहीदेखील बनावट आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी सांगितले.

ट्रान्स्फॉर्मरची संख्या वाढवा

आमदार नीलेश लंके म्हणाले, की पारनेर-नगर मतदार संघात ६३ केव्हीए क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरची संख्या २ हजार इतकी आहे. ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर तोच पुन्हा दुरुस्त करून देण्यात येतो. वारंवार दुरुस्तीमुळे हे ट्रान्स्फॉर्मर लगेच नादुरुस्त होतात. त्यासाठी ६३ केव्हीए क्षमतेचे ५०० ट्रान्स्फॉर्मर मिळावेत.

मतदार संघात विद्युतीकरण केल्यापासून टाकण्यात आलेल्या एलटी लाइन जीर्ण झाल्या आहे. कान्हूरपठार सबस्टेशन ते गोरेगाव सब स्टेशन यासाठी ३३ केव्हीए क्षमतेची लाइन टाकल्यास गोरेगाव, ढवळपुरी, भाळवणी या सब स्टेशनला ३३ केव्हीची रिंग होऊन शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होईल, असेही लंके यांनी निदर्शनास आणून दिले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT