Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road Dispute : शेतकरी प्रेरणा अभियानातून मिटणार बांधाचे, रस्त्यांचे वाद

Shetkari Prerana Abhiyan : ग्रामीण भागातील बहुतेक गुन्हे प्रॉपर्टी तथा शेतीच्या वादातूनच होतात, अशी वस्तुस्थिती आहे. शेतीचे वाद आता गावातच मिटवावेत म्हणून पोलिस प्रशासन महसूल विभागाच्या मदतीने शेतकरी प्रेरणा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Solapur News : ग्रामीण भागातील बहुतेक गुन्हे प्रॉपर्टी तथा शेतीच्या वादातूनच होतात, अशी वस्तुस्थिती आहे. शेतीचे वाद आता गावातच मिटवावेत म्हणून पोलिस प्रशासन महसूल विभागाच्या मदतीने शेतकरी प्रेरणा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस बंदोबस्तात महसूलचे अधिकारी त्या शेतावर जाऊन दोन शेतकऱ्यांमधील वाद मिटवतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी प्रेरणा अभियान राबविण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेतले जातील.

त्याचा सर्व्हे होऊन अहवाल पोलिस व महसूल प्रशासनाला जाईल. त्यानंतर तहसीलदार त्या त्या तालुक्याचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करून त्यांच्या नेतृत्वात तालुकानिहाय विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

शेजारील शेतकऱ्याच्या वादामुळे मोजणी थांबली आहे आणि त्यामुळे वाद होत आहेत, बांधाचा वाद आहे किंवा रस्त्याचा वाद आहे, अशा समस्यांवर त्याठिकाणी तोडगा काढला जाणार आहे, कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक पोलिस ठाण्यात पिंक रूम तयार केली जाणार असून त्याठिकाणी अन्यायग्रस्त महिला, अल्पवयीन मुलींचे जबाब घेतले जातील किंवा त्यांच्या तक्रारी घेणे, मेडिकल करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे होईल, असेही पोलिस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.

 गुन्हेगारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर

विधानसभा निवडणुकीतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी ड्रोनचा वापर केला होता. आता चोरी, अवैध वाळू उपसा, वाहतूक कोंडी अशा बाबींवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी नाईट व्हीजन ड्रोनसह अन्य प्रकारचे ड्रोन दिवस-रात्र विविध भागावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मागितला जाणार आहे. यशिवाय गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्हीचाही वापर होणार असून सायबर, स्थानिक गुन्हे शाखा व सोशल मीडिया टीम, सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सर्वच अधिकारी, अंमलदारांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी त्यांचे कौतुकही केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT