Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Disease : दुबार पेरणीनंतर हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव

Chana Crop Damage : हरभऱ्याची पहिली पेरणी केली. मात्र तेथेही काही शेतकऱ्यांचा घात झाला. बोगस बियाण्याने पहिली पेरणी वाया गेली. दुसरी पेरणी कशीबशी पूर्ण केली. मात्र त्यानंतरही हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : अगोदरच शेतकरी कर्जाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. त्यातच रब्बीचे पीक चांगले येईल, या भाबड्या आशेवर हरभऱ्याची पहिली पेरणी केली. मात्र तेथेही काही शेतकऱ्यांचा घात झाला. बोगस बियाण्याने पहिली पेरणी वाया गेली. दुसरी पेरणी कशीबशी पूर्ण केली. मात्र त्यानंतरही हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

अळीचेही आक्रमण झाल्यामुळे उत्पन्नात ५० टक्के घट निर्माण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हातचे पीकही वाया जाईल काय? असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

तालुक्यात यंदा रब्बी क्षेत्र वाढले आहे. त्यात खेडी सिम प्र.ज., खेडी खुर्द प्र.ज., अमळगाव, खवशी, पिंपळी, मेहरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल वाढला आहे. अमळगाव मंडळ व पातोंडा मंडळ परिसरात पेरलेले बी पूर्ण उगवले, पण मर रोगामुळे हिरवीगार झाडे उभी वाळत आहेत.

काही दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे व ढगाळ वातावरणाने जमिनीत बुरशी तयार होऊन, हरभऱ्यावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. खरिपातही निसर्गाने मोठे नुकसान केले. आता रब्बीतही असेच होते की काय? अशी शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

यंदा रब्बी पीक चांगले येईल, या आशेवर १२ ऑक्टोबरला हरभऱ्याची पेरणी केली. मात्र बोगस बियाणामुळे शेतात काहीच उगवले नाही. संबंधित कंपनीकडे दाद मागितली, ते पंचनामा करून गेले आहेत. कृषी विभागानेही पंचनामा केला आहे. उसनवारीचे पैसे घेऊन दुबार पेरणी केली, मात्र दुष्काळात तेरावा महिना यानुसार हरभऱ्यावर आता मर रोग तसेच अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बोगस बियाण्याबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे.
राजेंद्र पवार, शेतकरी, खेडी सिम प्र.ज. (ता अमळनेर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT