Onion Crops Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Disease : धुक्यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

Onion Crop Issue : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकांवर परिणाम होऊ लागला असून या धुक्याने कांदा उत्पादकांची चिंता वाढवली आहे.

Team Agrowon

Beed News : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकांवर परिणाम होऊ लागला असून या धुक्याने कांदा उत्पादकांची चिंता वाढवली आहे. वातावरणातील लहरीपणामुळे कांदा पिकांवर करपा, मावा, कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पीक धोक्यात आले असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांदा पिकावर फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात पिक घेतले असून चढ्या भावाने कांदा रोपे खरेदी करून कांदा लागवड करण्यात आली आहे. मात्र, दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे पहाटेच्या वेळेस प्रचंड धुके पडत असून या धुक्यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

या धुक्यामुळे कांद्यावर करपा, मावा या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध रोग नाशकाच्या फवारण्या करण्यात येत आहेत. आधीच लागवडीसाठी करण्यात आलेल्या खर्चानंतर या फवारणीच्या खर्चाची भर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आणखीनच वाढले आहे.

यंदा अवकाळी पावसाने कांद्याचे रोप गेले. त्यामुळे एका एकराला लागणारी रोपे ३५ ते ४० हजारांना घ्यावी लागली. सध्या धुक्याचे प्रमाणात वाढ झाल्याने कांद्याचे पीक जगविण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यासाठी मोठा खर्च येत आहे.
डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते.
सुरुवातीला लावलेली कांद्याची रोपं अवकाळी पावसाने गेली. त्यानंतर महागामोलाची कांदा रोपे घेऊन दुबार लागवड केली. जेवढा खर्च संपूर्ण काढणीला यायचा तेवढा आताच झालाय ‌ आता धुक्यामुळे फवारण्या कराव्या लागतील त्याचा खर्च वाढलाय आणि कांदा उत्पादकांचे खर्चाचं गणित बिघडले आहे.
कृष्णा कानडे, शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT