Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीत रब्बी हंगाम व्यवस्थापनावर चर्चा

Rabi Crop Management : झुरळ (बुद्रुक) येथे ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची’ या अंतर्गत स्थापना करण्यात आली आहे. ज्वारी संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. आर. बी. घोराडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात आला.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यातील झुरळ बुद्रुक येथे झालेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीत आगामी रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून विद्यापीठात हा उपक्रम राबवला जात आहे.

झुरळ (बुद्रुक) येथे ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची’ या अंतर्गत स्थापना करण्यात आली आहे. ज्वारी संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. आर. बी. घोराडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात आला. या शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संवाद साधला जातो.

या वेळी खरीप पिकांची पाहणी करण्यात आली. रब्बी पीक व्यवस्थानाकरिता सविस्तर नियोजन करण्यात आले. रब्बी ज्वारी पीक लागवडीसाठी बियाणे तरतूद, हरभरा बीज प्रक्रियेसाठी जिवाणू खताची उपलब्धता, गहू लागवडीसाठी योग्य वाणाची निवड याबाबत नियोजन करण्यात आले.

ज्वारी संशोधन विभागाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. गोपाल ठाकरे यांनी सोयाबीन व तूर पीक व्यवस्थापन तसेच रब्बी ज्वारी व हरभरा पीक लागवडीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र भोवते यांनी मृदा तथा पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

उत्कृष्ट पीक उत्पादक शेतकरी स्पर्धेअंतर्गत सहभागी शेतकऱ्यांच्या शेताला भेट देऊन पिकाची प्राथमिक पाहणी करण्यात आली. मंच्याच्या एकूण ४२ सदस्यांची या वेळी उपस्थिती होती.

सभेला शास्त्रज्ञ डॉ. अनिल गुल्हाने, मंचाचे अध्यक्ष अविनाश मेटांगे, गजानन मेटांगे, सारंगधर मेटांगे, सुखदेव टिकार, चंद्रभान भोजने, रामेश्वर मेटांगे, विलास जवळेकर, संतोष जवळेकर, लक्ष्मण टिकार, सुमित मेटांगे, गोपाल मेटांगे, बाळू मेटांगे, विलास मेटांगे, वासुदेव मेटांगे, बळीराम मेटांगे, दीपक मेटांगे, संतोष गवळेकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT