Maharashtra Rains Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Maharashtra: भंडारदरा, निळवंडेतून विसर्ग वाढवला

Maharashtra Dam Update: अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पाणीसाठा वाढ असल्याने भंडारदरा धरणातून पाणीविसर्ग वाढवला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagr News: अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पाणीसाठा वाढ असल्याने भंडारदरा धरणातून पाणीविसर्ग वाढवला आहे. सोमवारी (ता. ७) सकाळी भंडारदऱ्यातून ९,७७४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता.

पश्चिमेकडील पावसामुळे मुळा, निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून निळवंडेतून ११,२८३ क्युसेकने, तर ओझर बंधाऱ्यातून ३,८८३ क्युसेकने विसर्ग सुरू होता. ओझर बंधाऱ्यातून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारलेली आहे. पाऊस नसल्याने भात लागवड, खरिपाच्या पेरण्याही रखडल्या आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नसला तरी मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. हरिश्‍चंद्रगड, रतनवाडी, वाकी, घाटघर, पांजरे, कळसूबाई शिखराचा परिसर आदींसह अकोल्याच्या पश्चिम भागातील डोंगरपट्ट्यातील पावसामुळे धरणाचा पाणीसाठा वाढत आहे. गुरुवारपासूनच भंडादऱ्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

अकरा टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात ६५ टक्के पाणी स्थिर ठेवून विसर्ग केला जात आहे. सोमवारी धरणाचा पाणीसाठा ७२.१९ टक्के होता. पावसाचा जोर लक्षात घेता सोमवारी (ता. ७) भंडारदऱ्यातून ८,९३८ क्युसेकने विसर्ग सुरू होता. भंडारदऱ्यातून पाणी निळवंडे येते. निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

निळवंडे धरणाचा पाणीसाठा ८०.६६ टक्के झाला असून, निळवंडेतून ९,६१० क्युसेकने, तर ओझर बंधाऱ्यातून ३,३४६ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. हे पाणी आता जायकवाडी धरणात जात आहे. मुळा नदीतून कोतुळ येथून १३ हजार ३४२ क्युसेकने मुळा धरणात पाण्याची आवक होत होती. मुळा धरणाचा पाणीसाठा ६३.३८ टक्के झाला आहे. सीना धरण भरलेले असल्याने साडंव्यावरून १५७ क्युसेकने पाणी नदीत वाहत होते.

घाटशीळ पारगाव धरण कोरडेठाक

जिल्ह्यातील दक्षिण भागात मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने सीना धरणासह बहुतांश धरणे, गाव व पाझर तलाव भरले. मात्र घाटशीळ पारगाव (ता. पाथर्डी) धरणात मात्र टिपूसभरही पाणी आले नाही. धरण कोरडेठाक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT