Dam Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात धरणातून विसर्ग सुरू

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वत भागासह अन्य क्षेत्रातील सिंचन प्रकल्प भरले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. काही प्रकल्पांतून विसर्ग कमी झाला आहे. परंतु नद्या प्रवाही आहेत.

खानदेशात यंदा सातपुडा पर्वत भागातील प्रकल्प लवकर भरले आहेत. त्याला फक्त रावेर तालुक्यातील अभोडा व मंगरूळ प्रकल्पांचा अपवाद आहे. मंगरूळ व अभोडा प्रकल्पांत जलसाठे मुबलक आहेत. परंतु हे प्रकल्प मागील वर्षी सर्वप्रथम भरले होते. यंदा मात्र रावेर तालुक्यात कमी पाऊसमान आहे. भोकरी नदीलाही पूर आलेला नाही. यामुळे हे प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा आहे.

सध्या खानदेशात धुळ्यातील साक्री तालुक्यात अक्कलवाडा, जामखेली, मालनगाव, शिरपुरातील अनेर या प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. अनेर प्रकल्पदेखील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. नंदुरबारात सातपुड्यातील शहादामधील दरा, चिरडे, सुसरी हे प्रकल्प भरले आहेत.

तसेच देहली प्रकल्पही भरला आहे. या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात सातपुडा क्षेत्रातील यावलमधील निंबादेवी, हरिपुरा, वड्री, मोर या धरणांतून विसर्ग सुरू आहे. तसेच रावेरातील गारबर्डी किंवा सुकी धरणातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे.

खानदेशात सध्या तापीसह जळगावात कांग, धुळ्यात अनेर, पांझरा, नंदुरबारातील गोमाई व सुसरी, सातपुड्यातील उदय नदीला प्रवाही पाणी आहे. परंतु अन्य भागातील नद्यांना मात्र प्रवाही पाणी किंवा पूर नाही. त्यात वाघूर, गिरणा, भोकरी आदी नद्यांचा समावेश आहे.

तापी नदीवरील प्रकल्पांतून विसर्ग

तापी नदी खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबारातून प्रवाही होत पुढे गुजरातमधील उकाईत जाते. या नदीचे उगमस्थान मध्य प्रदेशातील बैतुल भागात आहे. सातपुडा पर्वतातातून ही नदी येते. या नदीक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यात या नदीवर भुसावळनजीक हतनूर मध्यम प्रकल्प आहे.

तसेच जळगावात शेळगाव बॅरेज आहे. धुळ्यात तापी नदीवर सुलवाडे बॅरेज आहे. तर नंदुरबारात सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज आहे. सातपुडा भागासह अन्य क्षेत्रात पाऊस होत आहे. हतनूरचे या आठवड्यात सुरवातीला १८ दरवाजे पूर्ण उघडे होते. सध्या या धरणाच्या १४ दरवाजांतून विसर्ग सुरू आहे. तसेच शेळगाव, सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनही विसर्ग होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT