Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : मंत्रालयातील बैठकीत अकोल्याच्या पीकविमा मुद्यावर चौकशीचे निर्देश

Crop Insurance Inquiry : गेल्या हंगामातील पीकविमा भरपाईच्या मुद्यावर सुरू तापलेल्या प्रकरणाचा अद्याप काहीही निकाल लागलेला नाही.

 गोपाल हागे

Akola News : गेल्या हंगामातील पीकविमा भरपाईच्या मुद्यावर सुरू तापलेल्या प्रकरणाचा अद्याप काहीही निकाल लागलेला नाही. याबाबत मंत्रालयस्तरावर अधिकाऱ्यांची बैठक झाली असून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हास्तर यंत्रणांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे या मुद्यावर शुक्रवारी (ता.दोन) जिल्हाधिकाऱ्यांनीही आता बैठक आयोजित केल्याची माहिती मिळाली आहे.

मागील हंगामात शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचा अत्यंत कमी पीकविमा मिळाला होता. काही शेतकऱ्यांना १५० रुपयांपासून मदत मिळाली. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही. बांधावर न जाताच वरचेवर कार्यवाही झाली. पंचनामे कृषी खात्याकडे सादर केलेले नाहीत, अशा विविध मुद्यांवर अकोला जिल्हयात पीकविमा कंपनीविरुद्ध वातावरण तापलेले आहे.

बाळापूरचे आ. नितीन देशमुख यांनी बाळापूर, पातूर, तालुक्यांत बैठका घेत आढावा घेतला तेव्हापर्यंत विमा कंपनीकडून कृषी खात्याकडे पंचनामेच देण्यात आलेले नव्हते. यावरून बाळापूरमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विमा कंपनी प्रतिनिधीविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच आमदार व इतर सदस्यांनी या मुद्यावर कंपनीविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या.

याची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार अहवाल देण्यात आला. याच मुद्यावर मंत्रालयस्तरावर कृषी सचिवांनी तातडीने जिल्हयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला कृषी आयुक्तालयाचे अधिकारीही सहभागी होते.

बैठकीत चर्चा करून पीकविम्याच्या गंभीर मुद्यावर शेतकऱ्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेत चौकशीचे निर्देश देण्यात आले. पीकविमा प्रकरणात कंपनीकडून कुठलीली ढिलाई, निष्काळजीपणा झालेला असेल तर कारवाई करण्याचे सुचवण्यात आले. पीकविम्याच्या प्रश्‍नावर आता शुक्रवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी, पीकविमा कंपनी प्रतिनिधींची बैठक बोलवली आहे.

पंचनाम्यांची होणार खातरजमा

लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी सातत्याने केलेल्या टिकेनंतर कंपनी प्रतिनिधींनी काही पंचनामे कृषी खात्याकडे दिल्याचे समजते. या पंचनाम्यांची आता कृषी अधिकारी खातरजमा करणार आहेत. त्या आधारे कारवाईची पुढील दिशा ठरेल, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT