Kolhapur Shirol Land agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Shirol Land : क्षारपड जमिनींचे सुधारणेसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी

Datta Sugar Factory Shirol : दत्त कारखान्यांच्या पाठपुराव्याने क्षारपड जमीन सुधारणा करण्याच्या प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Shirol : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्षारपड जमीन आहेत यावर शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला होता. दरम्यान दत्त कारखान्यांच्या पाठपुराव्याने क्षारपड जमीन सुधारणा करण्याच्या प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता देत असतानाच क्षारपड जमीन सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या संस्थांना हेक्टरी ७ हजार रुपयांप्रमाणे ९ कोटी ४५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्रकल्पास मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

शासनाच्या या निधीमुळे दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाच्या चळवळीला आणखी बळ मिळू शकते. नापिक जमिनीमुळे गेल्या तीस वर्षांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना क्षारपडमुक्तीचा दत्त पॅटर्न महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी केंद्राकडून ११ कोटी ४६ लाखांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यातील २ कोटी १९ लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. दत्त कारखान्याने क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मृद व जलसंधारण विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजुरीसाठी सादर केला होता.

या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाचे मुख्य अभियंता तथा सहसचिव सु.म. काळे यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णयाने मान्यता मिळाली आहे. शिरोळ तालुक्यातील १० हजार हेक्टर पाणथळ क्षारपड जमिनीपैकी शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, बुबनाळ, औरवाड, कुटवाड-हसूर या सात गावांमध्ये सच्छिद्र निचरा प्रणालीद्वारे सुमारे १९१० हेक्टर जमीन सुधारणा करण्याबाबतचा ५९.४५ कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.

राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीने त्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यानुसार १५४५ हेक्टर क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणेसाठी शासनाकडून ९ कोटी ४५ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले की, शिरोळ तालुका क्षारपडमुक्त करण्याचा निर्धार आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास शासनाकडून मान्यता मिळाल्यामुळे क्षारपडमुक्तीच्या दत्त पॅटर्नला आणखी बळ मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT