Agriculture Commissioner Ravindra Binwade Agrowon
ॲग्रो विशेष

Criminal Offence : सर्वेक्षकांकडून पैशाची मागणी झाल्यास आता थेट फौजदारी

Agriculture Commissioner Ravindra Binwade : राज्यात पीकविमा सर्वेक्षकांकडून बाधित क्षेत्र अधिक दाखविण्याची बतावणी करून पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकरणात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील.

Team Agrowon

Nagpur News : राज्यात पीकविमा सर्वेक्षकांकडून बाधित क्षेत्र अधिक दाखविण्याची बतावणी करून पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत. अमरावती, यवतमाळसह राज्यातील इतर जिल्ह्यांतून देखील अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकरणात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती कृषी आयुक्‍त रवींद्र बिनवडे यांनी नागपूर दौऱ्यात दिली.

पीकविमा तरतुदीतील निकषानुसार नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यास त्यामध्ये राज्य सरकारला आपला अधिकचा हिस्सा द्यावा लागतो. हा पैसा सर्वसामान्य करदात्यांचा आहे. असे असताना राज्यात नजीकच्या काळात पीकविमा सर्वेक्षक म्हणून नेमलेल्या खासगी व्यक्तींद्वारे नुकसान क्षेत्र अधिक दाखविण्याची बतावणी करून त्याआड शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी होत आहे.

राज्याच्या अनेक भागांतून याविषयीच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. अमरावतीमध्ये पैशाची मागणी झाल्याच्या कारणावरून सर्वेक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्‍यात २१ सर्वेक्षकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या दोन जिल्ह्यांतच नाही तर इतरही अनेक भागातून अशा तक्रारी वाढत्या आहेत. यातून जनमानसात एका चांगल्या योजनेविषयी नकारात्मकता निर्माण होत आहे. त्यामुळेच अशा तक्रारींची दखल घेत यापुढे थेट संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. त्याकरिता पोलिस प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचेही आयुक्‍त रवींद्र बिनवडे यांनी

त्या प्रकरणात अद्यापही कारवाई नाही

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात २१ विमा सर्वेक्षकांनी शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्याचा आरोप आहे. या सर्व २१ सर्वेक्षकाविरोधात वनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने ही तक्रार देण्यात आली असली तरी पोलिसांनी ती चौकशीत ठेवली आहे. आठवडाभरापेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही या प्रकरणात कोणतीच कारवाई झाली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT