Ration card Agrowon
ॲग्रो विशेष

APL Farmer Scheme : शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर

एपीएल योजनेअंतर्गत वितरित करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Hingoli News : एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र लाभधारकांना माहे जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी १५० रुपयाप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे.

या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात ३७ हजार ५३६ शिधापत्रिकाधारक आहेत. थेट हस्तांतर योजना (DBT-Direct Benefit Transfer) कार्यान्वित करण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशील नमुन्यात संबंधित रास्त भाव दुकानदारांकडे अथवा तहसील कार्यालय पुरवठा विभाग यांच्याकडे उचित कागदपत्रे, प्रमाणपत्राची पूर्तता करून अर्ज सादर करणे अत्यावश्यक आहे.

या योजनेअंतर्गत वितरित करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास सदर महिलेस बँक खाते काढून घेणे गरजेचे आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालींशी (RCMS) संलग्न असणे आवश्यक राहील.

म्हणजेच शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर (RCMS) आधार क्रमांक संलग्न असलेल्या लाभार्थ्यांनाच डीबीटी योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे.

एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उक्त नमूद केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे संबंधित रास्त भाव दुकानदार अथवा तहसील कार्यालय (पुरवठा) विभागाकडे त्वरित उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT