Agristack Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Agristack Yojana : ‘ॲग्रीस्टॅक’मुळे शेतकऱ्यांना मिळणार जलद आणि अचूक सुविधा

Farmer ID : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Team Agrowon

Nanded News : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात ८ ते १३ मार्चपर्यंत तालुक्यातील सर्व गावात फार्मर आयडी तयार करण्यासाठी सीएससी केंद्रामार्फत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आयडी तयार करण्याचे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी, अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील.

यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ‘ॲग्रीस्टॅक’ उपक्रमाची गावस्तरावर मोहीम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे.

शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाठी यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी (ता. ६) नियोजन भवन येथे प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळे दरम्यान सीएससी केंद्र चालकांना ॲग्रीस्टॅक आज्ञावली वापराचे प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यशाळेत निवासी उपजिल्हायधिकरी महेश वडदकर, तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, प्रभारी गटविकास अधिकारी नारवटकर, निवासी नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, महसूल नायब तहसीलदार काशिनाथ डांगे, तालुका पुरवठा अधिकारी रवींद्र राठोड उपस्थित होते.

‘ॲग्रिस्टॅक’मुळे मिळणार लाभ...

ॲग्रिस्टॅक योजनेतून थेट सरकारी अनुदान व मदत- पीएम किसान सन्मान निधी दरवर्षी थेट बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल. तसेच पीक विमा, पीक कर्ज मंजुरी, कृषी अनुदान, खत व बियाणे योजनेचा जलद लाभ मिळणार आहे.

यासोबतच हवामान अंदाज, आधुनिक शेती सल्ला आणि बाजारभाव माहिती, मृदा परीक्षण व खत सल्ला, राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजनांमध्ये प्राधान्य नवीन कृषी तंत्रज्ञान, अवजारे आणि सिंचन योजना, शेततळे, ठिबक सिंचन, गटशेती योजनेतील लाभ, गट नोंदणी व शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीसाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT