Agristack Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : फार्मर आयडीसाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत

Agristack Registration : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने कृषी व पदुम विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी क्रमांक काढून घ्यावा. कोणताही शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्हीसीद्वारे सर्व तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांना अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील शेतकरी नोंदणीबाबत आढावा बैठकीत दिल्या.

जिल्ह्यात २१ एप्रिल २०२५ अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ४ लाख ६ हजार ३२२ शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी पूर्ण केली आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने कृषी व पदुम विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भूसंदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रित तयार करण्यात येत आहे.

माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ३० एप्रिलपूर्वी शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT