Chana Procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Procurement : हरभरा खरेदी नोंदणीमध्ये ऑनलाइन पेऱ्याची अडचण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आधारभूत किमतीने हरभरा खरेदी करता हेक्टरी आठ क्विंटल उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन पीक पेरा अडचणीचा ठरत असून त्याचा परिणाम थेट आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीवर होतो आहे.

याशिवाय खरेदीसाठी कमी उत्पादकतेचा खोडा अजूनही कायम असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत असल्याची स्थिती आहे.

आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या केंद्रांवरून २८ मार्चपर्यंत केवळ ३७४ शेतकऱ्यांनीच ऑनलाइन नोंदणी केली. ऑनलाइन नोंदणीसाठी ऑनलाइन पीक पेरा हा प्रमुख अडथळा ठरताना दिसतो आहे.

पीक पेरे ऑनलाइन अद्ययावत नसल्याने ते शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि त्यांची नोंदणी करताना अडचणी येतात. जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात तहसील कार्यालयांना पीक पेरे ऑनलाइन अपडेट करण्याचे सूचित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परंतु हे पीक पेरे ऑनलाइन अपडेट होणार कधी हा प्रश्न आहे. आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या ३७४ शेतकऱ्यांपैकी केवळ ७५ शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले.

त्यापैकी गंगापूर केंद्रावरून १३ शेतकऱ्यांकडील २०२ क्विंटल ५० किलो हरभरा आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आला आहे. खरेदी करण्यात आलेला हरभरा अजून वखार महामंडळाच्या गोदामात जमा करणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आधारभूत किमतीने हरभरा खरेदी करता हेक्टरी आठ क्विंटल उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.

ही उत्पादकताही कमी असून याविषयी शेतकऱ्यांनी पणन विभागाकडे व पणन विभागाने वरिष्ठ व शासनाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. परंतु अजून उत्पादकता वाढी संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती पणन विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT