Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची वणवण

Agriculture Pump Electricity : खानदेशात कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी अनेक शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी अनेक शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे. यातच वीज वितरण कंपनीतर्फे दुष्काळी भागातील अतिपाणी उपसा अशी कारणे सांगून शेतकऱ्यांना नवी वीज जोडणी कृषिपंपांना दिले जात नसल्याची माहिती आहे.

जळगाव, धुळे जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार नवी वीज जोडणीचे प्रस्ताव गेले सात ते आठ महिने रखडले आहेत. मार्चपासून हे प्रस्ताव मार्गी लावण्याचे कामच रखडले आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे वर्षभरापूर्वी ज्या विहिरी अनुदान तत्त्वावर मागासवर्गीय, अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना देण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांनादेखील वीज जोडणी मिळत नसल्याची स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात या विहिरींचे सुमारे १० प्रस्ताव रखडल्याचे सांगण्यात आले.

इतर शेतकरीदेखील आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी विहिरी, कूपनलिका तयार करतात. परंतु नवे रोहित्र घ्यावे लागेल, संबंधित भागातील रोहित्रावर नवी जोडणी देता येणार नाही, तशी परवानगी नाही, नव्या रोहित्रासाठी एक लाख रुपये खर्च येईल, अशी बतावणी वीज वितरण कंपनीमधील मंडळी करते. यामुळे शेतकऱ्यांची अडचण अधिकची वाढत असून, ही समस्या कोणाकडे सांगावी व मार्ग कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

या समस्येची दखल घ्यायला अधिकारी तयार नाहीत. वीज कंपनीच्या कार्यालयात अनेक कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. अधिकारी भेटण्यास नकार देतात. यामुळे या खरिपातही पूर्वहंगामी (बागायती) कापूस पीक शेतकरी केवळ कूपनलिका किंवा विहिरीला वीज संयोजन नसल्याने घेवू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे.

ही स्थिती रब्बी हंगामातही होती. यामुळे रब्बीदेखील शेतकरी घेवू शकले नाहीत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार यांच्याकडे पाठपुरावा चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, धरणगाव भागातील शेतकरी करीत आहेत.

परंतु वीज वितरण कंपनीची मंडळी लोकप्रतिनिधींचेदेखील ऐकत नाही. ज्या भागात दुष्काळ आहे, त्या भागात अतिउपसा करणे कायद्याने योग्य नाही. २०० फुटांपेक्षा अधिक खोल कूपनलिकांना वीज संयोजन देणार नाही, असे वीज कंपनीमधील कर्मचारी सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT