Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : धारूरला अवकाळीने झोडपले

Crop Damage : मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. गुरुवारी (ता. ११) दुपारी तीनच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला होता.

Team Agrowon

Killedharur News : तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. गुरुवारी (ता. ११) दुपारी तीनच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला होता. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

या पावसाच्या दरम्यान आंबेवडगाव, सोनीमोहा, चोंडी, जहांगीर मोहा, धूनकवाड, थेटेगव्हाण, चोरांबा, अरणवाडी, पहाडी पारगाव या गावच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे आंबा, डाळिंब या फळपिकांसह मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती.

रब्बी हंगामातील उघड्यावर काढून टाकलेली ज्वारी, गहू, हरभरा पिके जोरदार पाऊस व गारपीट झाल्याने पूर्णपणे भिजून गेली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतातील आणि घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला होता. जोरदार पाऊस झाल्याने सोनीमोहा येथे अचानक नदीला पूर आला.

नदीत लावलेले ट्रॅक्टर काही अंतर वाहून गेले होते ते शेतकऱ्यांनी दोरीने बांधून थांबवले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या तर मोठे झाडी उन्मळून पडली. पावसादरम्यान झालेल्या विजेच्या धक्क्यामुळे सोनीमोहा येथे दोन शेळ्या दगावल्या. रेशीमसाठी उभारण्यात आलेले शेडवरील पत्रेही उडून गेले होते.

अंजनडोह येथील आंब्याच्या बागातील आंब्याचा सडा पडला होता. चोरांबा व आरणवाडी गावात असलेल्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. गारांचा मारा पक्ष्यांना लागल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची दिसून येत होते.

पंचनामाच्या सूचना

तालुक्यात अनेक गावांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच घराचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे धारूर तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी सांगीतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT