Siddheshwar Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Siddheshwar Yatra : ‘सिद्धेश्‍वर महाराज की जय’च्या गजरात योगदंडाची पूजा

Solapur News : श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून श्री सिद्धरामेश्‍वरांच्या हातातील योगदंड घेऊन हिरेहब्बूंसह थोबडे वाड्यात आले.

Team Agrowon

Solpaur News : शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराजांचे प्रतीक असलेल्या त्यांच्या हातातील योगदंडाची शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांचे वारसदार थोबडे यांच्या वाड्यात होमहवन व योगदंड पूजनाने केळवणाचा कार्यक्रम पार पडला.

शुक्रवार पेठेतील थोबडे वाड्यात शुक्रवारी (ता. १०) दुपारी १२ वाजता अ‍ॅड. रितेश थोबडे यांच्या हस्ते योगदंडाची पूजा करण्यात आली. योगदंडाला आकर्षक फुलांनी तर फुलांच्या रांगोळीने परिसर सजविण्यात आला होता.

‘श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून श्री सिद्धरामेश्‍वरांच्या हातातील योगदंड घेऊन हिरेहब्बूंसह थोबडे वाड्यात आले.

सोन्याच्या या योगदंडास चौरंगी पाटावर ठेवून संबळाच्या निनादात विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर होमहवन विधी करण्यात आला. अ‍ॅड. रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा केली. उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ॲड. मिलिंद थोबडे, सुचेता थोबडे आदी कुटुंबीय उपस्थित होते.

कै. रामचंद्र शेटे यांचे वारसदार म्हणून अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांच्याकडे १९८७ पासून म्हणजेच ३७ वर्षांपासून या विधीचा मान मिळाला आहे. यापूर्वी शेटे परिवाराकडून शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांची सेवा सुरू होती. आजतागायत ही परंपरा अविरतपणे सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT