Subhash Thackeray  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Development : शेतीसोबत जोडधंदा करून विकास साधावा : सुभाषराव ठाकरे

Subhash Thackeray : शेतकऱ्यांनी केवळ शेतीवरच अवलंबून न राहता जोडधंदा करीत विकास साधावा असे आवाहन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केले.

Team Agrowon

Washim News : शेतकऱ्यांनी केवळ शेतीवरच अवलंबून न राहता जोडधंदा करीत विकास साधावा असे आवाहन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केले. मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेलुबाजार येथील उपबाजारात आयोजीत शेतकरी चर्चासत्रात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे, प्रयोगशील शेतकरी गणेशराव नानोटे, माजी कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके, आदर्श शेतकरी रामेश्वर टेकाडे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले,

तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शालिग्राम राऊत, नारायण बारड, महादेवराव सुर्वे, दत्तात्रय भेराणे, राजेंद्र मिसाळ, भाऊराव व्यवहारे, विनोद जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्याने हताश होऊन आत्महत्या न करता बँकेसोबत एकरकमी कर्ज नील होण्यासाठी प्रयत्न करावे. अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना साडे सहा टक्के दराने तार कुंपणासाठी कर्ज देत असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,’’ असेही ते म्हणाले.

चंद्रकांत ठाकरे, गणेशराव नानोटे, प्रल्हाद शेळके, रवींद्र इंगोले यांनीही मार्गदर्शन केले. कृषी बाजार समितीचे संचालक केशवराव भगत, राजू राऊत, अमोल पाटील व पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT