Climate Change  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Variety : बदलत्या हवामानात तग धरणारे वाण विकसित करू

Climate Change : पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याव्दारे शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविता आले. शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधनास विद्यापीठाचे प्राधान्य आहे.

माणिक रासवे

Parbhani News : ‘‘पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याव्दारे शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविता आले. शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधनास विद्यापीठाचे प्राधान्य आहे. हवामान बदलांच्या स्थितीत तग धरणारे विविध पिकांचे वाण विकसित करण्यावर आगामी काळात भर राहील,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, आत्‍मा, कृषी विभाग यांच्यातर्फे आयोजित व केंद्रीय कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रशदर्शनाचा समारोप शुक्रवारी (ता. २३) झाला. या वेळी डॉ. मणी बोलत होते.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, माजी कुलगुरु डॉ. के. पी. गोरे, केंद्र सरकारचे सहसंचालक कृषी विस्तार श्रीपाद खळीकर, विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर, प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत वरपूडकर, अजयसिंह राजपूत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, संचालक बीजोत्पादन डॉ. देवराव देवसरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक रश्मी खांडेकर, नियंत्रक प्रवीण निर्मळ, कुलसचिव पी. के. काळे, मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते.

डॉ. गोरे म्हणाले, ‘‘विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांच्या बियाण्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्वासर्हता आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीत विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांनी काळानुरूप व हवामान बदलानुसार आपल्या पीक पद्धतीचा स्वीकार करावा.’’

‘विद्यापीठाशी शेतकऱ्यांना जोडण्यासाठी प्रयत्न करा’

दैठणा येथील शेतकरी दत्तात्रेय कच्छवे म्हणाले, ‘‘या कृषी मेळाव्याची व्यापक प्रसिध्दी झाली असती तर गावागावांतून मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले असते. या पुढील काळात विद्यापीठाशी अधिकाधिक शेतकरी जोडले जावेत, यासाठी प्रयत्न करावेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Care: जनावरांतील ‘ॲस्पिरेशन न्यूमोनिया’ची लक्षणे अन् उपाय

Dr.Milind Deshmukh: ‘फुले संगम-किमया’चे संशोधक डॉ. मिलिंद देशमुख सेवानिवृत्त

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी?; राजू शेट्टींचा सरकारला सवाल

Ativrushti Madat: अतिवृष्टीचे ३७४ पैकी २१९ कोटी रुपये अनुदान वाटप

Rabi Sowing: रब्बीचा पेरा आघाडीवर; हरभरा, गव्हासह मोहरीकडे शेतकऱ्यांचा कल

SCROLL FOR NEXT