Honey  Agrowon
ॲग्रो विशेष

Honey Village : रत्नागिरीतील देवडे, किरबेट बनणार ‘मधाचे गाव’

Honey Production : मधमाशी संवर्धनासोबत मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील देवडे आणि किरबेट ही दोन गावे ‘मधाचे गाव’ बनविण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : मधमाशी संवर्धनासोबत मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील देवडे आणि किरबेट ही दोन गावे ‘मधाचे गाव’ बनविण्यात येणार आहेत. राज्यात मांघर, पाटगाव नंतर या दोन गावांची निवड झाली आहे. मधाचे गाव संकल्पनेमुळे लोकांना गावातच रोजगार मिळणार असून कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधुपर्यटनालाही चालना मिळू शकते.

शेतीपीक उत्पादनात मधमश्‍यांच्या परागिकरणामुळे ३५ ते ४० टक्के वाढ होते. मधमाश्‍यांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा या उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी देवडे आणि किरबेट ही दोन गावे वसलेली आहेत.

या निसर्गसंपन्न गावांमधे कुऱ्हाड बंदी आहे. वृक्षतोड केली जात नसल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. या गावातील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ६० शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरणही केले आहे.

गावांत २०० ते ३०० मधमाश्‍यांच्या कॉलन्या आहेत. या गावांत सातेरी, आग्या मधमाश्‍यांच्या जाती आढळतात. परंतु आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करता यावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या गावातील शेतकरी दीडशे किलोपर्यंत मध संकलित करतात. हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करून गावात अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी मधाचे गाव हा उपक्रम राबविला जात आहे.

एक हजार पेट्यांमध्ये उपक्रम

या उपक्रमाअंतर्गत एक हजार पेट्या मधपालानासाठी देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० पेट्या देण्यात येणार असून आतापर्यंत ५० मधपालांना ४० पेट्या देण्यात आल्या आहेत. जिथे फुलोरा जास्त आहे त्या काळात एका मधपेटीतून सामान्यतः २५-३० किलो मध निघतो.

शेतकऱ्याने दहा मधपेट्या बाळगल्यास वर्षाला एका शेतकऱ्यास कमीत कमी ३०० किलो मध मिळतो. वर्षाकाठी एका शेतकऱ्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये प्राप्त होतात. या व्यतिरिक्त पोळ्यातून निघणाऱ्या मेणापासून अन्य उत्पादनेही तयार होतात. देवडे आणि किरबेट या गावांना मोठा इतिहास आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: ‘फार्मर आयडी’चे अपेक्षित लाभ कधी?

El Nino Forecast: ‘एल निनो’ मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची ९७ टक्के शक्यता

Dairy Business: तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे: अरुण चांभारे

Heavy Rain: धरण क्षेत्रात पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Soybean Seed Case: सोयाबीन बियाणे प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत; राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांची माहिती

SCROLL FOR NEXT