Manoj Jarange Patil Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation Hunger Strike: देशमुख कुटुंबीयांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

Deshmukh Family Meets Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे मंगळवारी (ता. २८) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखसह आई, मुलगा, भावजय यांनी श्री. जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे मंगळवारी (ता. २८) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखसह आई, मुलगा, भावजय यांनी श्री. जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी शनिवारपासून (ता.२५) उपोषण करत आहेत.

याआधी सोमवारी (ता.२७) रात्री धंनजय देशमुख यांनी उपोषणस्थळी श्री. जरांगे यांची भेट घेतली. या वेळी श्री. देशमुख म्हणाले, की श्री वे. आम्ही दुःखात असूनही श्री. जरांगे यांच्या सोबत कायम राहणार आहोत.

वैभवी देशमुख व देशमुख कुटुंबाच्या आग्रहाखातर जरांगे यांनी थोडे पाणी घेतले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी या ठिकाणी श्री. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गर्दी झाली होती.

अंतरवाली सराटी येथे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे व वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा, सलाइन, औषधे, रुग्णवाहिका आणि कर्मचारी उपलब्ध आहेत. एकूण ९ उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय अंबड (जि. जालना) या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.
डॉ. अनिल वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी, अंबड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion export India : कांद्याचे १५०, द्राक्षाचे ३०० कंटेनर अडकले; इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प, शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका

Gharkul Yojana: राज्यात एका वर्षात जवळपास ४ लाख घरकुले पूर्ण, हा आजपर्यंतचा विक्रम- जयकुमार गोरे

Poultry Farming: मुसळवाडीत कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद

Farm Loan Waiver: थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीबाबत कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Akot APMC: ‘एसआयटी’ चौकशीमुळे सहकार क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT