Silk Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Reshim Udyog : सेवापूर्ती गौरवानिमित्ताने उलगडली रेशीम उद्योग वाटचाल

यानिमित्ताने त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात रेशीम उद्योगाच्या मराठवाड्यासह राज्यातील यशस्वी व बदललेल्या वाटचालीचा उलगडा मान्यवरांच्या मार्गदर्शनातून झाला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जवळपास ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर रेशीम विभागाचे (Silk Department) उपसंचालक दिलीप हाके मंगळवारी (ता. २८) सेवानिवृत्त झाले.

यानिमित्ताने त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात रेशीम उद्योगाच्या (Silk Industry) मराठवाड्यासह राज्यातील यशस्वी व बदललेल्या वाटचालीचा उलगडा मान्यवरांच्या मार्गदर्शनातून झाला.

रेशीम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्री. हाके यांच्या सेवापूर्ती निमित्ताने आयोजित केलेल्या या सेवागौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील रेशीम विभागाचे उपसंचालक महेंद्र ढवळे तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक तथा रेशीम विभागाचे माजी सहायक संचालक डॉ. अधिकराव जाधव, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी राजेश इतवारे, सत्कारमूर्ती दिलीप हाके त्यांच्या पत्नी ज्योती हाके, बंधू मोतीराम हाके, मधुकरराव हाके, अंबादास हाके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रास्ताविक जालनाचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी केले. त्यानंतर पुण्याच्या सहायक संचालक रेशीम डॉ. कविता देशपांडे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाच एकरपासून सुरू झालेला मराठवाड्यातील रेशीम उद्योगाचा प्रवास आताच्या १० हजार एकरांपर्यंत कसा पोहोचला, तो विस्तार करताना कशी कसरत करावी लागली, हाके यांनी त्यामध्ये जपलेला सेवाभाव याविषयीचे विवेचन डॉ. जाधव यांनी केले.

उपसंचालक ढवळे, इतवारे यांनी वाटचाल उलगडली. सूत्रसंचालन अरुण गुट्टे यांनी केले. औरंगाबादचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT