Ajit Pawar agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार : अजित पवार

Deputy CM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले.

Team Agrowon

Ajit Pawar Nashik Tour : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शपथविधीनंतर काल खातेवाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ व नियोजन विभागाचा पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी माॅन्सूनचा पाऊस न पडल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

खातेवाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदी पदभार स्वीकारला. आज सकाळी लवकर अजित पवार नाशिक येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. नाशिकमध्ये दाखल होताच त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवारांच्या स्वागतासाठी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे रेल्वे स्थानकावर हजर होत्या.

राष्ट्रवादीतील बंड केल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यांची पहिलीच सभा येवल्यात घेतली. त्यापाठोपाठ अजित पवारांनी नाशिकचा दौरा करत शरद पवार यांना धक्का दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT