Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : ‘महसूल’कडे सरकारची प्रतिमा घडविण्याची किमया : उपमुख्यमंत्री पवार

Revenue Department : पुणे विभागीय आयुक्तालयात मंगळवारी (ता. १) आयोजित राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

Team Agrowon

Pune News : ‘‘सामान्य जनतेचा सर्वाधिक संबंध राज्याच्या महसूल विभागाशी येतो. सरकारची प्रतिमा घडविण्याची किंवा बिघडविण्याचीही किमया ‘महसूल’कडे असते. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेला चांगली सेवा मिळाली पाहिजे,’’ अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पुणे विभागीय आयुक्तालयात मंगळवारी (ता. १) आयोजित राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर उच्चपदस्थ अधिकारी या वेळी उपस्थित होते. “अधिकारी हुशार व चलाख असल्यास लोकप्रतिनिधींची कामे सुलभ होतात. कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख भूमिका घेतली पाहिजे. सरकारी कामकाजाची प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी तुमची आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही आहे. मात्र, कोणत्याही जिल्ह्यात एजंटगिरी खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

पवार म्हणाले,‘‘लोकांच्या सोयीसाठी विविध योजना आणल्या जातात. परंतु, त्याचा राज्याच्या आर्थिक नियोजनावर किती ताण पडणार हेदेखील बघावे लागते. कर्नाटकमध्ये लोकप्रिय घोषणा झाल्या व त्यानंतर पाच योजनांवर ६५ हजार कोटी रुपये देण्याची वेळ त्या राज्यावर आली. आम्ही लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत; मात्र राज्याच्या भविष्यकालीन विकासाला बाधा येईल, असे काहीही केले जाणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आज आहोत आणि उद्या नाहीत. परंतु, राज्याची वाटचाल पुढच्या पिढीसाठी आशादायक वाटली पाहिजे.’’

‘जे नसेल ललाटी ते लिहितो तलाठी’

‘‘महसूल विभागाच्या कामकाजाचा कसा परिणाम जनतेवर होतो याचे किस्से उपमुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले. “फेरफार उतारा कसा आणि केव्हा मंजूर होईल हे सांगता येत नाही. पूर्वी तलाठ्याच्या कामाचा सर्व जण धसका घ्यायचे. त्यातून ‘जे नसेल ललाटी ते लिहितो तलाठी’ अशी ख्याती गावपातळीवर झाली होती. अजूनही गावात तलाठी, तालुक्याला तहसीलदार हेच मोठे समजले जातात. त्यामुळे आपण जनतेला त्रास न होता सेवा दिली पाहिजे. तुमच्या कामातून सरकारची प्रतिमा पाहिली जाते,” असे ही श्री. पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT