Soybean and Cotton Price Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean and Cotton Price : सोयाबीन-कापूस दरवाढीचा मुद्दा केंद्र सरकारकडे नेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तुपकरांना आश्वासन

Ravikant Tupkar : सिंदखेडराजा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सोडवताना मागण्यांवर चर्चेसाठी पवार यांच्या अध्यक्षतेतखाली बुधवारी (ता.११) मुंबईत बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले होते

Team Agrowon

Buldana News : सोयाबीन, कापसाची दरवाढ करण्याच्या उद्देशाने राज्याचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे लवकरच जाईल. त्यांना दरवाढीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी विनंती करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.

सिंदखेडराजा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सोडवताना मागण्यांवर चर्चेसाठी पवार यांच्या अध्यक्षतेतखाली बुधवारी (ता.११) मुंबईत बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह शेतकरी मागण्यांशी निगडित खात्यांचे मंत्री, अवर सचिव, सचिव व इतर अधिकारी तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री. तुपकर व त्यांचे काही सहकारी उपस्थित होते.

बैठकीत पवार यांनी सांगितले, की मागील काळात दोन वेळी कर्जमाफी झाली, त्या दोन्ही कर्जमाफीचे काही शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत. तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येईल. शेडनेट नुकसान भरपाईबाबत सध्या कुठलेही निकष नाहीत. त्याबाबत निकष आणण्याचे सांगण्यात आले. पीकविम्याच्या मुद्यावर त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा केली जाईल. विमा कंपन्यांवर कडक कारवाई करण्याबाबतही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीची भरपाई आगामी आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्यात येईल. विदर्भात संत्रा-मोसंबीचे जे नकुसान झाले त्याचे पंचनामे तातडीने करण्याची सूचनाही त्यांनी संबंधितांना दिली. घरकुल, ठिबक-तुषार, यांत्रिकीकरण अशा विविध योजनांचे केंद्राकडे अनुदान थकले आहे, त्यावर तातडीने केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी सांगितल्याची माहिती तुपकर यांनी दिली. वन्य जिवांपासून शेतीला होत असलेल्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी कुंपण योजना आणण्याचे सांगितले. शेतकरी हिताच्या मागण्या १०० टक्के पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. लोकशाही मार्गाने लढा कायम राहील, असेही तुपकरांनी सांगितले.

‘भक्तिमार्ग रद्द करणार?’

या बैठकीत बुलडाणा जिल्ह्यातील प्रस्तावित सिंदखेडराजा-शेगाव हा भक्तिमार्ग रद्द करण्याची मागणी रविकांत तुपकरांनी केली. पिकाऊ जमीन मार्ग गिळणार असून, फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठा विरोध करीत आहेत, हेही त्यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांचा विरोध पाहता हा भक्तिमार्ग रद्द करण्याचा शब्द पवारांनी दिला, असे तुपकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT