Damodar Ingole Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : अग्रिम तत्काळ खात्यात जमा करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

Crop Insurance Compensation : सोयाबीनच्या नुकसानीच्या भरपाईपोटी पीकविम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी मंजूर करण्यात आली होती. मात्र, आता २० दिवस उलटूनही रक्कम खात्यात जमान न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसानीच्या भरपाईपोटी पीकविम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी मंजूर करण्यात आली होती. मात्र, आता २० दिवस उलटूनही रक्कम खात्यात जमान न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

१० डिसेंबरपर्यंत अग्रिम रक्कम न दिल्यास विमा कंपनी विरोधात रस्त्यावरील लढाई आणखी तीव्र करू असा इशारा, किन्हीराजा इथे झालेल्या सोयाबीन परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिला आहे. या परिषदेला स्वाभिमानीचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, अंकुश सुसर, चंदन राठोड, संतोष नालिंदे उपस्थित होते.

या वर्षी खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली होती. त्यामुळे पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम द्यावी अशी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली. मात्र, कंपनी त्यास टाळाटाळ करीत होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नागपूर उच्च न्यायालयात दोन लाख शेतकऱ्यांच्या वतीने याचिका दाखल केली.

अखेर कंपनीने २५ टक्के अग्रिम रक्कम देण्यास मंजुरी दिली. मात्र, आता २० दिवस उलटूनही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम टाकण्यात आली नाही. त्यामुळे श्री. इंगोले यांनी मंजूर केलेली रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना द्या, अन्यथा कंपनी विरोधातील लढाई आणखी तीव्र करू असा इशारा दिला.

किन्हीराजा येथे आयोजित सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. अमोल देशमाने, डॉ. निळकंठ घुगे, बंडू पिपळघट, गणेश मोरे, विजय इंगळे व परिसरातील शेतकऱ्यांनी या परिषदेचे आयोजन केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर टिकून; सोयाबीन स्थिर, बोरांना मागणी, स्ट्राॅबेरी दर तेजीत तर हिरवी मिरची टिकून

Wheat MSP Procurement : महाराष्ट्रात मागील पाच वर्षात केवळ १ हजार टन गव्हाची हमीभावाने खरेदी; केंद्र सरकारने लोकसभेत दिली आकडेवारी

Farmer Suicides: विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा विस्फोट! २५ वर्षांत ४ हजारांहून अधिक मृत्यू, आकडे थरकाप उडवणारे

Farmer Loss: खिर्डीसाठेत समाजकंटकाने पेटवला २२ एकरांवरील मका

AI in Agriculture: जलसंधारण व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

SCROLL FOR NEXT