PM Kisan Sanman Nidhi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Sanman Nidhi : ‘पीएम किसान’च्या लाभासाठी कृषी विभागाने कंबर कसली

IAS Abhijit Raut : गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करुन जानेवारीपर्यंत संपृक्तता मोहीम हाती घेतली आहे. याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

Team Agrowon

Nanded News : पीएम किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करुन ता. १५ जानेवारीपर्यंत संपृक्तता मोहीम हाती घेतली आहे. याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी मागील अनेक दिवसांपासून या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. यात बँक खाते आधार संलग्न नसलेले, ई-केवायसी प्रलंबित असलेले, स्वयंनोंदणी लाभार्थींची मान्यता प्रलंबित असलेले, स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी, भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थीची नोंदणी पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात १५ जानेवारीपर्यंत संपृक्तता मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी म्हणून ग्रामपातळीवरील कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सदरील विशेष मोहिमेत आधार सीडिंगसाठी पोस्ट खाते, सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे उपयोग करावा, तर ई-केवायसीकरिता ग्रामस्तरी नोडल अधिकारी (व्हीएनओ) व सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) यांच्यामार्फत कामकाज पूर्ण करण्यात सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रलंबित कामे आता गावातच

बँक खाते आधार संलग्न नसलेले, ई-केवायसी प्रलंबित असलेले, स्वयंनोंदणी लाभार्थींची मान्यता प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी, भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थीची नोंदीणी पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभार्थींची नोंदणी, अशी सर्व कामे आता गावातच पूर्ण होणार आहेत. त्यासाठी तालुका किंवा जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT