Team Agrowon
राज्यातील शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपुष्टात येणार असून पी. एम. किसान योजनेचा १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. तो जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे नियोजन केंद्र शासनाचे आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणी, ई-केवायसी, बँक खात्यास आधार क्रमांकास जोडणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे.
ज्यात पात्र शेतकरी कुटुंबास रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- लाभ देण्यात येतो
या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी गावपातळीवर दिनांक ६ डिसेंबर, २०२३ ते १५ जानेवारी, २०२४ या कालावधीत ४५ दिवसांची विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही मोहिमेची यशस्वी करण्याचे निर्देश डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त कृषी यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांना दिले आहेत.
या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.