Farmers' Demonstrations Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Issue : पीककर्जासाठी परळी तहसीलसमोर निदर्शने

Farmer Demand : मागच्या वर्षीचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.

Team Agrowon

Beed News : शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळावे, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लावलेले होल्ड काढावेत, वाण धरणावरील वीज पंपांची तोडलेली वीज तत्काळ जोडून द्यावी, मागच्या वर्षीचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने गुरुवारी (ता. ८) परळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी निदर्शने करण्यात आली.

या वेळी शेतकऱ्यांच्या घोषणेनी तहसीलचा परिसर दणाणून गेला होता. राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना विविध योजनेतून फायदा देत असल्याच्या जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च करीत असताना राष्ट्रीयीकृत बॅंका शेतकऱ्यांना त्रास देत आहेत.

शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने अडवणूक करण्याचे काम बॅंक प्रशासन करीत आहेत. यापुढे बॅंकांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास संबंधित बॅंकांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा अॅड. अजय बुरांडे यांनी दिला आहे. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांना देण्यात आले.

या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, सुदाम शिंदे, भगवान बडे, हनुमंत सोळंके, पप्पू देशमुख, विष्णू देशमुख, अंकुश उबाळे, विनायक राजमाने, विशाल देशमुख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

१३ ऑगस्टला बैठक

पीककर्ज व बॅंकांच्या समस्यांसंबंधी सहायक निबंधक, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे अधिकारी व किसान सभेचे पदाधिकारी यांची परळी तहसील कार्यालयात १३ ऑगस्ट रोजी बैठक बोलाविण्यात आली असल्याचे तहसील प्रशासनाने किसान सभेला पत्र दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT