Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukt Dharan : वडज धरणातील गाळ काढून शेतांमध्ये टाकण्याची मागणी

Agriculture News : कुकडी प्रकल्पातील वडज धरणातील गाळ काढून धरण गाळमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी मीना खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Agrowon

Pune News : कुकडी प्रकल्पातील वडज धरणातील गाळ काढून धरण गाळमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी मीना खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

वडज धरण क्षेत्रातील वडज, येणेरे, कुसूर, निरगुडे, बुचकेवाडी, गुंजाळवाडी, आर्वी, निमगाव तर्फे म्हाळुंगे आदी गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेता धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात गाळ टाकण्यात यावा, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

धरणातून दरवर्षी पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ माती, दगड, वाळू वाहून आल्याने धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. कागदावर धरण १०० टक्के भरते, पण प्रत्यक्षात पाणी साठा ७० टक्केच होत आहे. यामुळे गाळ माती काढून धरणाचे खोलीकरण आवश्यक झाले आहे.

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरण जलसंचय साठ्याचे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने येत्या पाच वर्षांत वडजबरोबर कुकडी प्रकल्पातील धरणे, कालवे यासाठी विशेष मोहीम राबविली पाहिजे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पवना, खडकवासला धरणांप्रमाणेच वडज धरणातील गाळही सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने काढण्यात यावे, अशी मागणी जुन्नर तालुका भारतीय किसान संघाचे युवक अध्यक्ष प्रशांत पाबळे यांनी केली आहे. याबाबत पाबळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT