Ration Shop Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Subsidy : शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याची मागणी

Ration Grain : अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याऐवजी रोख अनुदान देण्यात येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रोख अनुदानाऐवजी धान्य देण्याची मागणी केली आहे.

Team Agrowon

Amarvati News : अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याऐवजी रोख अनुदान देण्यात येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रोख अनुदानाऐवजी धान्य देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ३६ हजार २९३ कार्डधारक शेतकऱ्यांना अनुदान अद्यापही प्राप्त झालेले नाही. या शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने अनुदान रोखण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यानी सांगितले.

अन्नधान्य पुरवठा विभागाकडून एपीएल व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना धान्यपुरवठा करण्यात येत होता. गेल्या दीड वर्षांपासून यातील शेतकरी वर्गातील लाभार्थ्यांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याची योजना लागू करण्यात आली. प्रती व्यक्ती दीडशे रुपये प्रतिमाह अनुदान देण्यात येते.

जिल्ह्यात या योजनेत ७३ हजार ८४० कार्डधारक असून त्यावर २ लाख ८३ हजार ७६२ लाभार्थ्यांची संख्या आहे. यातील १ लाख ४५ हजार १६ लाभार्थ्यांना अनुदान मिळाले असून ३६ हजार २९३ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे.

त्यांनी केवायसी केली नसल्याने अनुदान देता आले नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यानी सांगितले. या लाभार्थ्यांनी तातडीने केवायसी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 मिळणाऱ्या अनुदानातून धान्य घेणे कठीण

शासनाकडून एपीएल गटातील शेतकऱ्यांना धान्याऐवजी दीडशे रुपये प्रती लाभार्थी इतके अनुदान दिले जाते. या अनुदानात बाजारातून धान्य खरेदी करणे कठीण असल्याने रोख अनुदानाऐवजी प्रती लाभार्थी धान्य देण्याची मागणी शेतकऱ्यांनी अन्नधान्य पुरवठा विभागाकडे केली आहे. मात्र त्यासाठी शासनस्तरावर निर्णय होणे आवश्यक असल्याने स्थानिक विभागाने असमर्थता दर्शविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT