Soyabean Agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean Crop : सोयाबीनवरील ‘यलो मोझॅक’बद्दल मुख्यमंत्र्यांना साद

Soyabean Crop Diseases : यलो मोझॅकमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज घोषित करावे, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकावर यलो मोझॅक नावाच्या रोगाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हे पीक हातातून गेले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. यलो मोझॅकमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज घोषित करावे, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यलो मोझॅकमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून आमदार सावरकर यांनी ठिकठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्ह्यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांत हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीमही हाती घेतली. परंतु अचानक सोयाबीनचे पीक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घडल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील ही परिस्थिती कळताच शेतीशिवरांना भेट देऊन रोगामुळे नुकसान झालेल्या भागात प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना नुकसाभरपाईची मिळण्यासाठी साद घातली.

तज्ज्ञांनी कायमस्वरूपी बंदोबस्त सूचवावा

बदललेले हवामान व रोगांच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे. मृदा संतुलनात मोठा बिघाड निर्माण झाला आहे. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांपुढे आहे.

सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग सध्या आहेत. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा.

पीक नुकसानीसंदर्भात सरकारने जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना द्याव्यात. नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करताना तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने असला पाहिजे. शेतकऱ्यांच्या फायद्याचा असला पाहिजे, अशा सूचना प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणीही शासनाकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाने झोडपले; धरणांतून विसर्ग

Legislature Adjourned: विधिमंडळाचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण

Monsoon Disaster: बारा जणांचे मृत्यू सुलतानी कारभारामुळे; काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT