Agriculture Electricity Connection agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

Agriculture Pump Power Supply : पन्हाळा तालुक्यातील पडळ वीज केंद्राअंतर्गत चौदा गावांतील पावसाळ्यापूर्वी खंडित केलेला कृषिपंपांचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करावा, अशी मागणी चौदा गावांच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : पन्हाळा तालुक्यातील पडळ वीज केंद्राअंतर्गत चौदा गावांतील पावसाळ्यापूर्वी खंडित केलेला कृषिपंपांचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करावा, अशी मागणी चौदा गावांच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.

जूनमध्ये मॉन्सून वेळेत दाखल झाला. यामुळे खरिपातील भात, भुईमूग, नाचणी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी होऊन उगवण चांगली झाली. जुलैमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे नुकसान झाले.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. खरिपातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगाम सुरू झाला आहे.

पावसाळ्यापूर्वी महावितरणने पडळ वीज केंद्रांतर्गत येणाऱ्या यवलूज, सातार्डे, पडळ, माजगाव, कसबा ठाणे, माजनाळ, पुनाळ, पुशिरे, खोतवाडी, माळवाडी, शिंदेवाडी, देवठाणे, म्हाळुंगे आदी गावांतील विहिरीवरील तसेच नदीवरील कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने खंडित केला आहे, आता माळरान बुरमाळ, डोंगरी तसेच नदीकाठच्या तांबड्या मातीतील ऊस व इतर पिके कोमेजू लागली आहेत. आडसाली उसासाठी पाण्याची गरज आहे.

यंदा पाऊस चांगला झाला, परंतु अतिवृष्टी, महापूर व परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले. सध्या पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्यामुळे पिके कोमजून वाळू लागली आहेत. महावितरणने कृषिपंपांचा वीजपुरवठा त्वरित सुरू करावा.
- स्वरूप चौगले, शेतकरी, माजगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT