Agriculture Electricity Connection agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : सिंचनासाठी नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी

Agriculture Irrigation : शेतातील उभ्या पिकांना पाण्याची गरज असताना गेल्या काही दिवसांपासून विजेअभावी सिंचन करणे शक्‍य होत नाही.

Team Agrowon

Yavatmal News : शेतातील उभ्या पिकांना पाण्याची गरज असताना गेल्या काही दिवसांपासून विजेअभावी सिंचन करणे शक्‍य होत नाही. परिणामी पिके करपत आहे. त्याची दखल घेत विजेचा लपंडाव थांबवावा, अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, यावर्षीच्या हंगामात सुरुवातीला पावसाचा खंड त्यानंतर अतिवृष्टी, महापूर अशी परिस्थिती उद्भवली. बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे आधीच उत्पाकदता प्रभावीत झाली आहे. सध्या शेतात कपाशी, तुरीचे पीक उभे आहे.

तापमानात वाढ झाल्याने या पिकाला पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी आहेत, असे शेतकरी सिंचनासाठी पुढाकार घेतात. परंतु शेतशिवारात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. अवघे काही तासच कृषिपंपांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे मुबलक पाणी असताना सिंचन कसे करावे, हा प्रश्‍न आहे.

सिंचनाच्या नावावर एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली जात असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. पीक करपल्यास शेतकऱ्यांसमोर कौटुंबीक गरजा भागविण्यासोबतच येत्या हंगामाकरिता लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आव्हान राहणार आहे. परिणामी विजेचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा.

शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी महावितरणचे अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मारोती गौरकार, बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बदकी, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष, शाहरुख शेख, अंकुश माफूर, आकाश भेले, समीर कुडमेथे, रॉय सय्यद, प्रफुल्ल उरकुडे, अनिल गेडाम उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT