Canal Lining  Agrowon
ॲग्रो विशेष

Canal Lining : कुकडी कॅनॉलच्या अस्तरीकरणाची मागणी

Kukdi Canal : जुन्नर तालुक्याच्या येडगाव धरणावरून जात असलेल्या कुकडी प्रकल्पातील कुकडी डाव्या कालवा हा २४९ किलोमीटरचा असून या कालव्याच्या कामाला जवळपास ३५ ते ४० वर्षांहून अधिक दिवस झालेले असल्याने ठिकठिकाणी अस्तरीकरण निघाले आहे.

Team Agrowon

Pune News : बोरी बुद्रुक येथून जाणाऱ्या कुकडी प्रकल्पातील कुकडी कॅनॉलच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून, भविष्यात कालवा फुटण्याचा धोका असल्याने अस्तरीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जुन्नर तालुक्याच्या येडगाव धरणावरून जात असलेल्या कुकडी प्रकल्पातील कुकडी डाव्या कालवा हा २४९ किलोमीटरचा असून या कालव्याच्या कामाला जवळपास ३५ ते ४० वर्षांहून अधिक दिवस झालेले असल्याने ठिकठिकाणी अस्तरीकरण निघाले आहे.

त्यामुळे या कालव्याला जेव्हा पाणी सोडले जाते तेव्हा मोठ्या प्रमाणावर गळती होत असते. अनेक ठिकाणी भिंती खचलेल्या असून या भिंतीमधून मोठ्या प्रमाणात दर सेकंदाला हजारो लीटर पाणी कॅनॉलच्या कडेला असलेल्या जमिनीत जाऊन ती नापीक झालेली आहे.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे हा कालवा फुटून त्या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या कालव्याचे अस्तरीकरण लवकर न केल्यास या कालव्याला मोठा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT