Paddy Production Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Production : धानाच्या उत्पादकतेत वाढीची मागणी

Paddy Sale Center : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी एकरी १०.५६ क्‍विंटलची उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chandrapur News : पूर्व विदर्भातील सहा पैकी पाच जिल्ह्यांत धानाचे उत्पादन होते. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी एकरी १०.५६ क्‍विंटलची उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र ही सरासरी उत्पादकता कमी असल्याने त्यात १५ ते १६ क्‍विंटल अशी वाढ करावी, अशी मागणी आमदार बंटी भांगडिया यांनी केली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर सोबतच चंद्रपूर जिल्ह्यांत धानाचे उत्पादन होते. मात्र मॉन्सूनोत्तर पावसाने धानाचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून होत आहे.

दरम्यान जिल्ह्यात धानाची हमीभावाने खरेदी होते. यासाठी काही जिल्ह्यांत पणन मंडळ तर काही जिल्ह्यांत आदिवासी विकास मंडळाकडून खरेदी केंद्र सुरू केले जातात. त्यापूर्वी कृषी विभागाकडून सरासरी उत्पादकता निश्‍चित होते.

यावर्षी जिल्ह्यात सरासरी उत्पादकता एकरी १०.५६ क्‍विंटल निश्‍चित करण्यात आली आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून धान उत्पादकता वाढीसाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे एकरी सरासरी १०.५६ क्‍विंटल सरासरी उत्पादकता ठरविल्याने ज्या शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन जास्त आहे.

अशा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. ब्रम्हपूरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांची उत्पादकता १५ ते १६ क्‍विंटल आहे. ही बाब लक्षात घेता हमीभाव खरेदीसाठी सरासरी उत्पादकतेत वाढीची मागणी आमदार भांगडीया यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT