Hirda  Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Crop : हिरड्याच्या नुकसानीपोटी भरपाई देण्याची मागणी

Crop Damage : हिरडा नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी किसान सभेचे डॉ. अतुल चौधरी यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची अमळनेर (जि. जळगाव) येथे भेट घेऊन केली.

Team Agrowon

Pune News : हिरडा नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी किसान सभेचे डॉ. अतुल चौधरी यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची अमळनेर (जि. जळगाव) येथे भेट घेऊन केली.

या वेळी मंत्री अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे आश्वासन दिले. या वेळी डॉ. प्रशांत देवरे, व डॉ. दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

राज्यात जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शेती पिकांचे फळबागांचे तसेच घरे व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झालेले होते. विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला होता. याबरोबरच या तालुक्यातील आदिवासी समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचेही या वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते व नुकसान भरपाईविषयी अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. ही नुकसान भरपाई मिळावी, यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्यपूर्ण जनआंदोलन व प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे.

नुकतेच १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालय, मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आदिवासी विकास विभागात पार पडली. या वेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व मदत, पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित होते.

हिरडा नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असे तीनही कॅबिनेट मंत्री यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वासित केले होते. परंतु ही नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही. या पार्श्‍वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची त्यांच्या मतदार संघात म्हणजेच अमळनेर येथे किसान सभेच्या सदस्यांनी भेट घेऊन हिरडा नुकसानभरपाई आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मिळण्याची विनंती करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT