Bamboo Sup Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Sup : गौरी पूजनासाठी बांबूच्या सुपांना मागणी

Gauri Pujan : बदलत्या काळानुसार बांबूचे सूप, टोपल्या कालबाह्य झाल्‍या असल्‍या तरी सण-उत्सवात त्‍यांना आवर्जून मागणी असते. गौरी पूजनासाठी कोकणात ओवसा महत्त्वाचा असतो.

Team Agrowon

Poladpur News : बदलत्या काळानुसार बांबूचे सूप, टोपल्या कालबाह्य झाल्‍या असल्‍या तरी सण-उत्सवात त्‍यांना आवर्जून मागणी असते. गौरी पूजनासाठी कोकणात ओवसा महत्त्वाचा असतो. यंदा मूळ नक्षत्र असल्याने औवसा साजरा करण्यात येणार आहे,

त्‍यासाठी तालुक्‍यात हजारो सुपांची विक्रीतून मोठी उलाढाल होत असल्‍याने बुरूड व्यावसायिकांना गणेशोत्‍सवानिमित्त सुगीचे दिवस आले आहेत. घाटमाथ्यावरील सूपविक्रेते कोकणात दाखल झाले असून १५० ते २०० रुपये दराने विक्री होत आहे.

गणरायाच्या आगमनानंतर मंगळवारी (ता. १०) ज्‍येष्ठागौरी आवाहन आहे. महाडसह पोलादपूर बाजारपेठेत पूजा साहित्‍यासह फळा-फुलांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. महाड, पोलादपूरमधील बुरूड व्यावसायिकांनी हजारो सुपे बनवली असून १६ बंदी सुपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यंदा एक सूप २०० ते २५० रुपये तर लहान सुपे १०० ते १५० रुपयांना विकले जात आहे.

पोलादपूरमध्ये ५३० तर महाडमध्ये १,३०० पेक्षा जास्त गौरींचे आगमन व पूजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत दीड हजारापेक्षा जास्‍त सुपांची विक्री झाल्‍याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

गणेशोत्सवात बांबूच्या सुपांना मोठी मागणी आहे. गौरी पूजेत ओवसा भरण्यासाठी बांबूच्या सुपांना प्राधान्य दिले जाते. यंदा चांगला रोजगार मिळत आहे.
सुधीर माने, व्यावसायिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT