Sugarcane Crop agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crop : पाणी टंचाईमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादनावर परिणाम

Monsoon Delay : माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकतील अनेक भागात पाणी पातळी खालवले. पाणी टंचाईचा ऊस उत्पादनवर परिणाम जाणवू लागला आहे.

Team Agrowon

Sugarcane Crop Damage : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये माॅन्सूनचा पाऊस दाखल होण्यास विलंब होत असल्याने पाणी टंचाईची समस्या जाणून लागली आहे. त्याचा ऊस शेतीवर परिणाम झाला आहे. तसेच नवीन ऊस लागवडीसाठीही उशीर होत आहे.

या दोन राज्यांसाठी पुढील १० दिवस महत्वाचे असून पाऊस सक्रिय न झाल्यास यंदाच्या गळीत हंगामात (२०२३-२४) उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख ऊस उत्पादक असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात भूजल पातळी घटली आहे. यावर्षी कोल्हापूर, बेळगाव, सांगली, बागलकोट, सातारा आणि सोलापूर या प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांमधील पाणीसाठा कमी झाला असून धरणांनी तळ गाठला आहे.

रेणुका शुगर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक विजेंद्र सिंग म्हणाले, अपुऱ्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी उसाची लागवड करत नाहीत. त्यामुळे सध्या ऊसाची लागवडीची गती कमी झाली आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यापर्यंत, १६ जूनपर्यंत देशभरात ऊसाची एकूण लागवड क्षेत्र ४९.८० लाख हेक्‍टरपर्यंत झाली.गेल्यावर्षी ४९. ३८ लाख हेक्टर होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ टक्कांनी लागवड कमी झाली आहे.

कोल्हापुरातील साखर विक्रेते अभिजित घोरपडे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात ऊसाची अवस्था बिकट आहे. पाण्याअभावी उभे पीक सुकू लागले आहे. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी जनावरांना चारा म्हणून ऊसाचा वापरण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर यंदाच्या गळित हंगामामध्ये साखर उत्पादनात सुमारे १५ टक्के नुकसान होऊ शकते. एकदा का ऊस पिकाचे नुकसान झाले की ते सावरणे कठीण असते.

कर्नाटक ऊस उत्पादक संघाचे सचिव अथल्ली देवराज यांनी सांगितले की, पुरेशा पाण्याअभावी कर्नाटकातील सुमारे १०-१५ टक्के क्षेत्रामध्ये ऊस सुकत आहे,

उलुवाप्पा बालगेरी म्हणाले, उत्तर कर्नाटकातील २० साखर कारखाने असलेल्या कलघटगीमध्ये दिवाळीनंतर पाऊस पडला नाही. पाणी टंचाईमुळे परिसरातील बोअरवेल कोरड्या पडल्या. परिणामी, उभे पीक सुकत आहे. त्यामुळे यावर्षी उसाखालील सुमारे २५ हजार एकरांपैकी निम्मे क्षेत्र सुकले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT