Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : तीन लाख हेक्टरवर लागवड, धूळपेरणी पूर्ण

Kharif Season 2025 : खानदेशात खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी सुरू झालेली नाही. पूर्वहंगामी कापसाची लागवड तेवढी आटोपत आली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी सुरू झालेली नाही. पूर्वहंगामी कापसाची लागवड तेवढी आटोपत आली आहे. पेरणी सरासरी क्षेत्रापेक्षा कमी होऊ शकते. जळगावात कापसाची सर्वाधिक सुमारे चार लाख ७० हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित असून, जिल्ह्यात अपेक्षित क्षेत्रातील सुमारे ९२ टक्के क्षेत्रात पेरणी होईल, असा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र सात लाख ६७ हजार हेक्टर आहे. अद्याप लागवड एक लाख ७० हजार हेक्टरपर्यंत झाल्याचा अंदाज आहे. यात कापूस लागवड अधिक असून, गेल्या आठवड्यातच पूर्वहंगामी कापूस लागवड ८० टक्क्यांवर झाली होती. खानदेशात १४ लाख हेक्टरवर पेरणीची अपेक्षा आहे.

धुळ्यातील सर्वसाधारण चार लाख हेक्टर तर नंदुरबारमध्ये सुमारे पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र खरिपातील पिकांखाली येणार आहे. या जिल्ह्यांतही कापूस लागवड अधिक राहणार आहे. यंदा पाऊस चांगला आल्यास पेरणी ९० ते ९२ टक्के होईल. कारण अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. पेरणी १०० टक्के होणार नाही, अशीही स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात पाऊस हवा तसा नाही.

खानदेशात लागवड व धूळपेरणी एकूण सुमारे तीन लाख हेक्टरवर झाल्याचा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक कापूस पीक आहे. यापाठोपाठ उडीद व संकरित अन्य पिकांची पेरणी, लागवड झाली आहे. काहींनी धूळपेरणी केली आहे. यंदा मक्याची लागवडही अधिक होईल. खानदेशात मक्याची सुमारे तीन लाख हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे.

ज्वारीची पेरणी सुमारे ५० ते ६० हजार हेक्टरवर होणार आहे. सोयाबीनची पेरणीदेखील खानदेशात ६० ते ६० हजार हेक्टरवर जाईल. कांदा लागवडही वाढेल, अशी स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर, धुळ्यात १० ते १२ हजार हेक्टरवर तर नंदुरबारमध्ये सुमारे दी हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. बाजरीची पेरणी सुमारे सहा ते सात हजार हेक्टरपर्यंत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT