Dam Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : नांदेडमध्ये प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट

Water Shortage In Nanded : नांदेड जिल्ह्यात तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यासह शेतीसिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

Team Agrowon

Nanded Water Issue : नांदेड जिल्ह्यात तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यासह शेतीसिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या एकूण १०४ प्रकल्पांत २२०.३० दशलक्ष घनमीटरनुसार ३०.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. यामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला होता.

परंतु यंदा तापमानात झालेली वाढ यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच शेतीसिंचनासाठी पाणी पाळ्या देण्यात आल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रकल्पात ४१.६० दलघमीनुसार ५१.४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ४७.१३ दलघमीनुसार ३४.१० टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ३१.९० दलघमीनुसार २२.९४ टक्के पाणीसाठा आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्यांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.

८० लघू प्रकल्पात ३४.७१ दलघमीनुसार २०.०९ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यांत ६४.९६ दलघमीनुसार ३६.२३ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत २२०.३० दशलक्ष घनमीटरनुसार ३०.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४६१.४९ दलघमीनुसार ५६.९९ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ३.९२ दलघमीनुसार ४.८५ टक्के पाणीसाठा आहे.

तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ४५४.८२ दलघमीनुसार ४७.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आह, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प - दलघमी - टक्केवारी

विष्णुपुरी - ४१.६० - ५१.४९

मानार- ४७.१३ - ३४.१०

मध्यम प्रकल्प (९) -३१.९० - २२.९४

लघू प्रकल्प (८०) - ३४.७१ - २०.०९

उच्चपातळी बंधारे (९) - ६४.९६ - ३४.२३

एकूण प्रकल्प १०४- २२०.३० - ३०.२६

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी - ४६१.४९ - ५६.९९

सिद्धेश्‍वर - ३.९२ - ४.८५

इसापूर- ४५४.८२- ४७.१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT