Livestock Vaccination Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Update : ठाणे, पालघरच्या ग्रामीण भागात पशुधनाच्या संख्येत घट

Livestock : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांकडे असलेले पशुधन हे वाढण्याऐवजी त्याच्यात कमालीची घट होऊ लागली आहे.

Team Agrowon

Mumbai News : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांकडे असलेले पशुधन हे वाढण्याऐवजी त्याच्यात कमालीची घट होऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात येथील शेतीमध्ये सेंद्रीय खतांचा अभाव दिसून येण्याबरोबरच गावोगावी मिळणारे गाय, म्हशीच्या दुधाऐवजी अन्य देशांतून आयात होणाऱ्या दुधाच्या पावडरचे प्रमाण वाढीस लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशाची अर्थिक राजधानी व जागतिक बाजारपेठ असलेल्या मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागातील काही वर्षांपूर्वी कोटीच्या संख्येत पशुधन होते.

या जिल्ह्यातून दररोज लाखो लिटर दूध मुंबई बाजारपेठेत जात होते. गायी-म्हशींपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर येथील शेतीमध्ये केला जात होता. पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणारा वाडा कोलम सेंद्रीय खतामुळेच नावारूपाला आला होता. दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.

९८ टक्के गायरानावर अतिक्रमण

ब्रिटिश राजवटीत महसूल गावांची निर्मिती करताना संबंधित गावाच्या एकूण क्षेत्रापैकी १० टक्के क्षेत्र हे गायरानासाठी राखीव ठेवण्यात आले होते. या राखीव क्षेत्रावर गेल्या ७५ वर्षांत अतिक्रमण होऊन ते फक्त दोन टक्के शिल्लक राहिले आहे. नव्याने वाढत असलेल्या वस्त्यांसाठी गावठाण उपलब्ध होत नसल्याने गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Production Policy: चारा उत्पादन धोरण राबवविणार: राधाकृष्ण विखे पाटील

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

SCROLL FOR NEXT