Tomato Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Tomato Production : नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोल्यासह पारनेर, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी टोमॅटो लागवडी केल्या जातात.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : जिल्ह्यातील संगमनेर, अकोले भागात होणाऱ्या उन्हाळी टोमॅटो लागवडीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्यानेही झाडांचे नुकसान होत आहे.

शिवाय यंदा गतवर्षीच्या तुलनेत दर कमी असल्यानेही टोमॅटो उत्पादक अडचणीत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी जानेवारी-फेब्रुवारीऐवजी मार्च-एप्रिलमध्ये टोमॅटो लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोल्यासह पारनेर, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी टोमॅटो लागवडी केल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कुकुंबर मोझॅक, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावासह अन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. गेल्या वर्षी या काळात टोमॅटोला फारसा दर नव्हता.

ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षी जानेवारी-फेब्रुवारीऐवजी मार्च-एप्रिलच्या काळात लागवड केली आणि जून महिन्यात पीक विक्रीला आले त्या वेळी अधिक दर मिळाला होता. त्यामुळे यंदा सुरुवातीच्या काळातील टोमॅटो लागवडी करण्याऐवजी पाडव्यानंतर लागवडी करण्याला प्राधान्य दिले असून यंदा मार्च-एप्रिलच्या काळातील लागवडी अधिक वाढल्या आहेत.

मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा ते वीस टक्के टोमॅटो लागवडी घटल्या आहेत. यंदा संगमनेर तालुक्यात ६५० हेक्टरवर टोमॅटो लागवडी झाल्या आहेत. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्याचाही झाडांवर टोमॅटो झाडावर आणि फळांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीतच असल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीच्या काळात बहुतेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी केल्या नाहीत. यंदा उन्हाचा तीव्र परिणाम टोमॅटो पिकावर आहे. दरही गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने अडचणीत भर पडली आहे.
- संदीप गुंजाळ, टोमॅटो उत्पादक शेतकरी, खांडगाव, ता. संगमनेर
साधारण जानेवारी-फेब्रुवारीत लागवड केलेले टोमटो एप्रिलमध्ये तोडणीला येतात. गेल्या वर्षी या टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. शिवाय दरही फारसा नव्हता. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिल या काळात टोमॅटो लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

Water Withdrawal Ban: चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदी

Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले

Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प

LPG Cylinder Booking: सिलिंडर संपण्याची भीती, बुकिंग ८८ लाखांवर, गॅस टंचाईवर केंद्रानं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT