Poultry Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Shed Tax : पोल्ट्रीशेड ग्रामपंचायत कर, वीजबीलाचा लवकरच निर्णय

Poultry Farming : पोल्ट्रीशेड बांधकामावरील मालमत्ता कराबद्दल, वीजबील शेतीपंपाच्या दराप्रमाणे आकारण्यात यावे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पोल्ट्रीशेड बांधकामावरील मालमत्ता कराबद्दल, वीजबील शेतीपंपाच्या दराप्रमाणे आकारण्यात यावे. तसेच पोल्ट्री व्यवसायासाठी अनुदानित सौरऊर्जा प्रकल्पाची तरतूद करण्यात यावी, या बाबतचे निवेदन मुंबई येथे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. संबंधित विषयांवर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन श्री. विखे पाटील यांनी दिले.

या वेळी कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य सुदर्शन पोकळे, धनंजय आहेर, अनिल खामकर, विलास साळवी, एकनाथ मुंगसे, शरद गोडांबे आणि महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स संघटनेचे दीपक पाटील, नंदकुमार चौधरी,

कमलाकर शिंदे, प्रकाश लसने, मनोज दासगावकर, किशोर गोवारी, अभिमन्यू मुंगसे, सुनील मुंगसे, संदीप सरोदे, विजय पवार, अक्षय नाईकवाडी आदी उपस्थित होते. या वेळी वरील सर्व मुद्द्यांवर माननीय मंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

या सर्व मुद्द्यांवर विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी मागील बैठकीत कुक्कुट खाद्य बॅगवर घटक छापण्याबाबत अंमलबजावणी होऊन ज्या कंपन्या टाळाटाळ करत असतील त्यांची पशुसंवर्धन आयुक्तांकडून आढावा घेऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rasta Roko Protest : वडखळ-अलिबाग राज्यमार्ग दीड तास ठप्प

India Trade Policy: टॅरिफ बनले शस्त्र, पण भारत कोणाच्याही दबावाखाली झुकणार नाही, अन्न सुरक्षेबाबत कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच, उडदाचे भाव कमी, केळीचे दर स्थिर, कारलीला उठाव तर गवार तेजीतच

Farmer Relief : औशाचे आमदार करणार शेतकऱ्यांना मदत

SCROLL FOR NEXT