Benefit of Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : आंबा, काजू पीकविमासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

Crop Insurance Scheme : रत्नागिरी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

Team Agrowon

Ratnagiri News : आंबा, काजू पीकविमा काढण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. मागील वर्षीचा विमा परतावा जिल्ह्यातील २४ हजार बागायतदारांना मिळालेला नाही; मात्र नवीन हंगामातील विम्यासाठी शेतकऱ्यांना हप्ता भरावा लागणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या आंबिया बहरासाठी योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले आहे. अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून फळबागांना विमा संरक्षण मिळणार आहे.

जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या महसूल मंडलात आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक आहे. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू आहे.

एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये व विमा हप्ता १३ हजार ३०० रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपाये व विमा हप्ता ५ हजार रुपये आहे. हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग आर्द्रता इ. माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जातात.

परताव्यापोटी ८१ कोटी शक्य

विमा योजनेअंतर्गत ८१ कोटी २४ लाख २८ हजार ३४ रुपयांचा परतावा जिल्ह्यातील २४ हजार ६१३ शेतकऱ्यांना गतवर्षीसाठी मिळेल, अशी शक्यता आहे. मागील हंगामात आंबा उत्पादन अत्यल्प असल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्यामुळे परतावा मिळेल अशा अपेक्षेत बागायतदार होते.

परंतु पुढील हंगामाचा विमा हप्ता भरण्याची वेळ आली तरीही परतावा न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील २६ हजार २८२ आंबा व ५ हजार ८३५ काजू उत्पादक मिळून ३२ हजार ११७ शेतकऱ्यांनी एकूण १७ हजार ६२२.४३ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता.

पीकविम्यासाठी फळपिकांची नोंद सात-बारा उताऱ्यावर बंधनकारक असल्यामुळे ई-पीकपाहणीद्वारे फळपिकांच्या नोंदी करून घ्याव्यात. या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र, बँक तसेच ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहायक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT