Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी सेवेच्या पदांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत

Agriculture Service Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संयुक्त पूर्वपरीक्षेत कृषी सेवेच्या पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संयुक्त पूर्वपरीक्षेत कृषी सेवेच्या पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी सेवेतील २५८ पदे ही राज्यसेवेच्या परीक्षेत समाविष्ट झाली असून, त्यासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश करून भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी होती. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंतीही करण्यात आली होती. मात्र, मागणी मान्य होत नसल्याने स्पर्धा परीक्षार्थींनी पुण्यात आंदोलन केले.

या आंदोलनामुळे राज्य शासनाने नियोजित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश संयुक्त पूर्वपरीक्षेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संयुक्त पूर्वपरीक्षा १ डिसेंबर रोजी होणार आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेला नाही; परंतु ते परीक्षेचे निकष पूर्ण करत आहेत, अशा उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेसाठी अर्ज करता येईल. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या, तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार कृषी सेवेसाठी पात्र ठरणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांना कृषी सेवेचा पर्याय मिळणार आहे.

नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात येईल. परीक्षेच्या दिवशी अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारांना कोणती परीक्षा द्यावयाची आहे, या बाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT